![]() |
पंडित आलूरे |
नळदुर्ग :- अणदूर ता. तुळजापूर येथील प्रगतशील शेतकरी पंडित शिवाप्पा आलूरे यांचे शुक्रवारी दि 10 रोजी विजेच्या धक्याने निधन झाले होते. त्यांच्यावर आज शनिवार रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले
यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण साहेब, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, वसंतराव वडगावें, राज पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी मोकाशे, सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश लंगडे, संचालक बालाजी घुगे, माजी सरपंच धनराज मुळे, फुलवाडीचे माजी सरपंच नागनाथ हांडगे, माजी सरपंच गुरुनाथ कबाडे, जवाहर विद्यालयाचे प्राचार्य संगमेश्वर जळकोटे, ग्रामपंचायत सदस्य डॉ जितेंद्र कानडे, डॉ नागनाथ कुंभार, बापू कुलकर्णी , दीपक घुगे अणदूर भाजपचे अध्यक्ष दीपक घोडके, साहेबराव घुगे, अप्पू धमुरे, यांच्यासह नातेवाईक, परीसरातील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता, काल आणि आजही अणदूरची संपूर्ण बाजारपेठ बंद होती.