नळदुर्ग :- गुजनुर ता. तुळजापूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे व आण्णाभाऊ साठे चौक येथे लहुजी शक्ती सेना शाखेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते पुजन करून मिरवणूकीला सुरवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित बांधवांना संबोधित करताना महेंद्र धुरगुडे यांनी शासकीय योजनेची माहिती दिली. मातंग समाजाच्या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील श्री. महेंद्र काका धुरगुडे यांनी केले व काही कामे असतील तर माझ्याशी संपर्क साधावा अशी विनंती उपस्थितांना केली.
जयंती समितीच्या वतीने महेंद्र धुरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एका चिमुकलीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर चांगल्या प्रकारे भाषण केल्याबद्दल रगुडे यांनी बक्षीस देऊन अभिनंदन केले.
यावेळी सरपंच व्यंकट साळुंके , पोलीस पाटील किशोर वाघमारे, उपसरपंच संतोष पाटील, महादेव महाराज मोरे, गणेश मोरे, तंटामुक्त अध्यक्ष कांचन वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ साळुंखे, बाळु देडे, सचिन खंदारे, अतुल मोरे, संजय मोरे, लक्ष्मण मोरे यांच्यासह जयंती समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.