सन 2014 च्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीत जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली होती. तत्पूर्वी पक्षश्रेष्ठीनी मुलाखत घेतली होती. मात्र ऐनवेळी पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाचा आदर राखत धुरगुडे यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतला आणि सुरु झाला झंझावताचा प्रवास….!
सध्या महेंद्र धुरगुडे यांचा जनसंपर्काच्या माध्यमातून दररोज 200 किलोमीटर प्रवास होत आहे. विशेष बाब म्हणजे उस्मानाबाद येथील त्यांच्या राहत्या घरापासून जिल्हा परिषदेचा त्यांचा मतदार संघ 82 कि.मी. दूर असुनही मतदार संघातील प्रत्येक गावास भेटी देण्याचे प्रमाण इतर सदस्यांच्या मानाने अधिक असल्याने मतदार संघात ते लोकप्रिय ठरत असल्याची चर्चा रंगत आहे. आकर्षित करणारी घटना म्हणजे स्वत:च्या जि.प. मतदार संघाबाहेरही त्यांचे कार्य जोमात सुरु आहे. त्याचा “तुळजापूर लाईव्ह” ने घेतलेला हा आढावा…
-    उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी (सन 2017) नंदगाव गटातील बोळेगाव या छोटयाशा खेडयातील खंडू रुपनर या गेल्या गरीब मुलास दिलेले आश्वासन पूर्ण करुन धुरगुडे यांनी अवघ्या महिनाभरातच आश्वासन पुर्ततेची चुणूक दाखवून आपल्या झंझावातास प्रारंभ केला.
-    सन 2013 मध्ये सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या नंदगाव येथील बसवराज मल्लिनाथ मिणजगे या मुलाच्या कुटूंबियास सन 2017 मध्ये पाठपुरावा करुन शासनाकडून मदत मिळवून दिली.
-    सन 2015 साली सलगरा मडडी येथील साठवण तलावात बुडून मृत्यू पावलेल्या बळीराम सुरेश राठोड व अरविंद तानाजी जाधव यांच्या कुटूंबियांना सन 2017 मध्ये राजीव गांधी सानुगृह अपघात निधी मिळवून दिला.
-    रामतीर्थ येथील प्रणिता मोहन पवार या कराटेपट्टूस आर्थिक मदत केली. या मदतीनंतर श्रीलंका येथे झालेल्या स्पर्धेत या मुलीने सुवर्णपदक पटकाविले.
-    अनाथ असलेल्या पुजा इटकर या मुलीच्या पत्रास प्रतिसाद देवून सोलापुर येथे विवाहाप्रसंगी उपस्थित राहून कन्यादान केले. तत्पूर्वी विवाहासाठी सर्वोत्तोपरी मदत केली.
-    शहापूर येथील धोंडिबा मारुती नवाडे या शेतक-याची बैलजोडी वीज पडून दगावली होती. त्यास महिनाभरात शासकीय मदत मिळवून दिली.
-    दहिटणा ता. तुळजापूर येथे स्वखर्चाने बौध्द विहार बांधून दिले...
-    विकास कामासंबंधी महेंद्र धुरगुडे यांची धडाडी पाहून पुणे येथील लोकप्रतिनिधी बजेट कार्यशाळेसाठी उस्मानाबाद जिल्हयातून एकमेव जि.प. सदस्य म्हणून फेब्रुवारी 2018 मध्ये निवड करण्यात आली.
-    सलगरा दिवटी येथील किसन सखाराम केदार या जळीतग्रस्त शेतकरी कुटूंबियास जीवनावश्यक वस्तूची मदत केली.
-    राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्हयातील शेकडो मुलांच्या कुटूंबियांना शासकीय मदत मिळवून दिली आहे.
-    तीर्थक्षेत्र विकास निधीतून नळदुर्ग येथील नानीमाँ दर्गाह परिसराच्या विकासासाठी आठ लाख रुपये मंजूर केले आहे.
-    सलगरा दिवटी येथील टेलरची मुलगी हिना पठाण यांना शैक्षणिक मदत केल्यामुळे आज ही मुलगी अभियंता म्हणून नामांकित कंपनीत कार्यरत आहे.
-    तुळजापूर विधानसभा मतदार संघातील 41 गावात सह्याद्री मल्ट्रिस्पेशालिस्ट उस्मानाबाद यांच्या सहकार्याने कान तपासणी व श्रवणयंत्र मोफत वाटपाचा कार्यक्रम घेवून जवळपास 3600 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. अजूनही शिबीराच्या माध्यमातून हे कार्य सुरु आहे.
      महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून हजारो लोकांना मदत मिळवून देण्याचे मोलाचे कार्य महेंद्र धुरगुडे हे करत आहेत. याबाबत ग्रामीण भागातून अनेकांच्या तोंडून पुढील वाक्य ऐकावयास मिळत आहे, “सरकारने ही योजना महेंद्र धुरगुडे यांचे कार्य पाहूनच आणली असावी”
महेंद्र धुरगुडे यांना समाजकार्य करण्याची ऊर्जा, प्रेरणा कुठून मिळते याबद्दल जाणून घेऊया रविवार दि. 19 ऑगस्टच्या भागात...

यापुर्वीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
http://www.tuljapurlive.com/2018/08/blog-post_37.html

 
Top