काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायतचे लिपिक पदावर कार्यरत असणारे कुंडलिक ढगे यांच्या 35 वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवार दि. (23) रोजी ग्रामसभेत विद्यमान सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सौ. शामलताई हंगरगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते कुंडलिक ढगे व पत्नी सौ. शांताबाई ढगे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, हार घालून सत्कार करण्यात आला.
नियमाने जरी निवृत्त व्हावे लागले तरी ग्रामपंचायतला आपल्या मार्गदर्शनाची गरज - सरपंच आदेश कोळी
ग्रामपंचायतच्या सर्व नोंदी, ग्रामपंचायतचे सर्व दप्तर व्यवस्थित ठेवणे, ग्रामपंचायतच्या विकास कामात मदत करणे आदी कामात ग्रामपंचायतच्या कर्मचार्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे कुंडलिक ढगे हे जरी 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियमानुसार सेवानिवृत्त व्हावे लागले असले तरी आपल्या अनुभवाच्या मार्गदर्शनाची ग्रामपंचायतला गरज असल्याचे ढगे यांच्याशी चर्चा करताना सरपंच आदेश कोळी यांनी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सौ. शामलताई हंगरगेकर, सयाजीराव देशमुख, सुर्यभान हंगरगेकर, सुजित हंगरगेकर, प्रदीप साळुंके, ग्रामसेवक सतिश शिंदे, करीम बेग, बाळासाहेब भाले, सुहास साळुंके, बापु वाडकर, भैरी काळे आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.