उस्मानाबाद :- महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी दिसून येतात. त्याची अनेक कारणे असली तरी व्यायामाचा अभाव हेही प्रमुख कारण आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींवर व्यायाम परिणामकारक ठरू शकतो. व्यायामातूनच महिलांचे आरोग्य तसेच मनही सदृढ राहते, त्यामुळे महिलांनी स्वत:साठी वेळ काढून व्यायाम केलाच पाहीजे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशन लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ.स्मिता शहापूरकर यांनी व्यक्त केले.

स्लीम लेडीज फिटनेस क्लब आणि इंडियन मेडिकल असोसिएशन लेडीज विंगच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि. २३) शहरातील उंबरे कोठा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ.शहापूरकर बोलत होत्या. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेक्रेटरी डॉ.श्रध्दा मुळे, डॉ.वसूधा दापके-देशमुख, डॉ.अश्विनी तांबे-देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी बोलताना डॉ.शहापूरकर यांनी महिलांच्या एकूणच आरोग्याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, कुटंुबाची खरी जबाबदारी उचलणारी महिला उपवास करून स्वत:चे शरीर कमजोर बनवित आहे. त्यामुळे शरिरामध्ये एचबी कमी असणे, ब्लडप्रेशर कमी-जास्त होणे, असे अनेक आजार जडतात. धावपळीच्या काळात महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ.श्रध्दा मुळे म्हणाल्या, महिलांमध्ये एचबी कमी असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी डॉ.अश्विनी तांबे-देशमुख, डॉ.वसूधा दापके-देशमुख यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. ऋतुजा देशमुख यांनी महिलांच्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारच्या व्यायामाची गरज आहे, यासंबंधी माहिती दिली.निदान लॅब आणि महालॅबच्या वतीने महिलांसाठी रक्तातील मोफत तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी अर्चनाताई अंबुरे,वर्षाराणी कुदळे,भाग्यलक्ष्मी कसबे, सीमा उंबरे, मनिषा उंबरे, सारिका उंबरे, शोभा राऊत, मीराबाई सातपुते, गयाबाई राऊत,अर्चना शिनगारे, सागरबाई अंकुशे, कुसूम उंबरे, कल्पना डांंेगरे,लीना झांबरे, अर्चना गायकवाड, अनिता घेाडके, कल्पना शानमे, सृष्टी शेळके, रजनी कोळगे, सुरेखा जगदाळे, शुभांगी दंडनाईक आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रागिणी पाटील यांनी केले. या शिबिरात ९५ महिलांची आरोग्य तपासणी तर ५४ महिलांची रक्त तपासणी करण्यात आली.

 
Top