नळदुर्ग :- ब्रेन डेड नंतर अवयदान केलेल्या नळदुर्ग येथील युनूस शेख यांना सर्वपक्षीय व सर्वधर्मीय, सामाजिक संघटनेच्यावतीने शुक्रवार दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी साडे वाजता येथील शासकीय विश्रागृहात सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली.
नळदुर्गचे रहिवाशी व जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक युनूस शेख यांचे मंगळवार रोजी अपघातात गंभीर जखमी झाले होते. सोलापुर येथील अश्विनी रुग्णालयात ब्रेन डेड नंतर युनूसच्या कुटूंबियांनी युनूसचे अवयदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाच जणांना नवसंजीवनी व नवीन आयुष्य मिळाले. शुक्रवारी रोजी नळदुर्ग येथे युनूस शेख यास सामुयिक श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे नगरसेवक विनायक अहंकारी, बसवराज धरणे, राष्ट्रवादीचे नगरसेवक महालिंग स्वामी, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले, माजी तालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर घोडके, एमआयएमचे युसूफ शेख, राष्ट्रवादीचे बशीर शेख, माजी नगरसेवक सुधीर हजारे, शिवबसवराणा जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नवल जाधव, परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, भटके विमुक्त संघटनेचे अशोक अलकुंटे, उमेश नाईक, पत्रकार शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, तानाजी जाधव, विलास येडगे, सुहास येडगे, सतीश राठोड, आयुब शेख, लतीफ शेख यांच्यासह विविध पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
व्हिडिओ पहा -