नळदुर्ग :- स्वर्गीय माणिकराव कदम-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई व एच.व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विदयमाने तुळजापुर तालुक्यातील विविध गावात दि.25 ऑगस्ट ते दि. 3 सप्टेंबर या कालावधीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.  

तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर येथे दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दि. 26 रोजी फुलवाडी व धनगरवाडी, दि. 27 रोजी इटकळ, दि. 28 रोजी आरबळी, दि. 29 रोजी हिप्परगा ताड, दि. 30 रोजी येवती, दि. 31 रोजी दिंडेगाव व टेलरनगर, दि. 1 सप्टेंबर रोजी काटगाव, दि. 2 रोजी खानापूर, दि. 3 रोजी चव्हाणवाडी व खडकी या गावात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. तरी संबंधित गावच्या परिसरातील लाभार्थ्यांनी या शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 



 
Top