तुळजापूर :- आज आधुनिक युगातिल महिला या पुरुषांपेक्षा पुढे आहेत. स्त्रिया आपले जीवन जगत असताना सतत दोन भूमिकांमध्ये जगत असतात. त्या ज्या पदावर काम करतात तेथील कर्मचारी म्हणुन व स्वतःच्या परिवारात त्या वेगळ्या भूमिकेत असतात. समाजाचा एक आधारभूत पाया स्ञीयांवरच अवलंबून असल्याने स्ञीयांवर होणाऱ्या अन्यायावर तात्पुरते उपाय न करता संबंधित अभियानात सातत्य आवश्यक असण्याचे प्रतिपादन महिला सुरक्षा परिसंवादामध्ये बोलताना माजी नगराध्यक्षा ॲड. मंजुषा मगर यांनी तुळजापूर येथे केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शनिवार दि. 25 ऑगस्ट रोजी महिला सबलीकरण विभागाच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महिला सुरक्षा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्षा अॅड. मंजुषाताई मगर हे बोलत होत्या.
पुढे बोलताना ॲड. म्हणाला की, महिलांनी समाजात आत्मविश्वासाने वागणे गरजेचे आहे. ज्यावेळी स्ञीयांवर अत्याचार होतात. त्यावेळी समाजाने जागृतपणे महिलांना योग्य आधार, प्रतिसाद दिला पाहिजे, महिलांनी कोणत्याही प्रकारचे अयोग्य निर्णय न घेता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा अनमोल संदेश त्यांनी या वेळी दिला.
अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ .एस.बी.शेतसंदी म्हणाले की, पालकांनी मुलिंवर अविश्वास दाखऊ नए,त्यांच्या शिक्षणाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली. यावेळी प्रा.डॉ.आनंद मुळे, आनंद कंदले, संजय बोंदर यांनीही प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. सी.आर. दापके, प्रा.डॉ. फर्जाना तांबोळी, प्रा. सविता कदम यांनी अनमोल सहकार्य केले. सूञसंचलन प्रा. आशपाक आतार यांनी तर आभार सौ. अश्विनीताई शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी, विदयार्थिनीनी उपस्थित होते.
