चौसाळा (प्रा. गणेश गिराम) :-
बीड जिल्हयातील चौसाळा येथे दर वर्षी प्रमाणे श्रावण महीन्यातील अखंड हरीनाम सप्ताह आहे.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, साग्र संगीत सुश्राव्य भागवत कथा ,हरीपाठ,भारुड व किर्तन सोहळ्यास उद दि. २७ ऑगस्ट पासुन प्रारंभ होत आहे.
सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज सोळंके शेगांवकर हे करणार असुन साग्र संगीत सुश्राव्य भागवत कथा ह.भ.प.भास्कर बुवाजी महाराज नाशिककर हे करणार आहेत.त्याच प्रमाणे सप्ताहात नामांकीत किर्तनकार यांची सेवा होणार आहे.त्यात ह.भ.प.श्रीनिवास महाराज जगताप पालसिंगनकर,आळंदी ,ह.भ.प.मंगल महाराज जगताप निगडी पुणे ,ह.भ.प.मदन महाराज मेहुणकर ,ह.भ.प.सौ.उषाताई महाराज मुंडे बीड ,ह.भ.प.डाॅ.प्रमोद महाराज कुमावत औरंगाबाद ,ह.भ.प विशाल महाराज खोले मुक्ताईनगर ,ह.भ.प. सुधाकर महाराज मेहुणकर यांची किर्तन सेवा होणार आहे.तसेच ह.भ.प.प्रभाकर महाराज कुटे यांचा भारूडाचा कार्यक्रम दि.३० आॅगस्ट २०१८ रोजी सायंकाळी किर्तनानंतर लगेचच होईल.
दररोज सकाळी ५ते ६ काकडा भजन,सकाळी ७ ते १०ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,सकाळी १० ते ११ तुकाराम महाराज गाथा भजन ,दुपारी २ ते ५ श्रीमद भागवत कथा ,सायं ५ ते ६ हरीपाठ ,राञी ९ ते ११ हरी किर्तन व नंतर जागर असे कार्यक्रम होणार आहेत .तसेच भजन सम्राट ह.भ.म प्रल्हाद महाराज झेंडेकर ,ह.भ.प.संजीवनीताई हाळदे ,ह.भ.प.शाम महाराज शेगांव ,दिपक महाराज पडूळे,विलास महाराज देशमुख ,किशोर महाराज लढे शेगांव तुशिराम दाभाडे ,मृदंगविशारद ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव ,करण चौधरी आदी नामांकीत गायक व वादक तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळ तसेच गजानन महाराज संस्थान शेगांव येथील गायक वादक व चौसाळा येथील भजनी मंडळ सात दिवस हजर राहील.
दि.३ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी नगर प्रदक्षिणा होऊन ११ ते १ या वेळेत ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती बंकट स्वामी संस्थान,निनगुर यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होणार आहे.त्यानंतर सार्वजनीक महाप्रसाद होईल.
तरी चौसाळा व परीसरातील सर्व भाविक भक्तानी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे अवाहन समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.
