नळदुर्ग :- सर्वात जास्त काँग्रेस बुथ कमिटी कार्यकर्त्यांची नेमणूक तुळजापूर विधानसभा मतदार संघात आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून कार्यकर्त्यांनी आगामी होणा-या निवडणुकीकरिता एक दिलाने कार्य करण्याचे आवाहन आमदार बसवराज पाटील यांनी नळदुर्ग येथे आयोजित शहर काँग्रेस पार्टी बुथ कमिटी व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले. 

शनिवार रोजी नळदुर्ग शहरातील नॅशनल मराठी शाळेच्या प्रागंणात बुथ कमिटी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. पाटील हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा‍ विदयमान आमदार मधुकराव चव्हाण हे होते. तर व्यासपीठावर जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, नगरपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते नय्यर जहागिरदार, माजी जि.प. सदस्य दिलीप भालेराव, दिलीप सोमवंशी आदीजण उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात आ. मधुकरराव चव्हाण म्हणाले की, पुढच्या वर्षी होणा-या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युवक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगून त्यांनी बुथ कमिटीच्या युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी कुलस्वामिनी सुत गिरणीचे संचालक अख्तर काझी, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, नगरसेवक बसवराज धरणे, माजी नगराध्यक्षा झिमाबाई राठोड, मगंल सुरवसे, माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक, माजी नगरसेवक सचिन डुकरे, इमाम शेख, सुधीर हजारे, शाहेदाबी सय्यद, सुभद्रा मुळे, कल्पना गायकवाड, चेअरमन सुरेश हजारे, संजय दळवी, रणजितसिंह ठाकुर,  शशिकांत पुदाले, मारुती खारवे, जिलानी कुरेशी, शरणाप्पा कबाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक विनायक अहंकारी तर प्रास्ताविक नगरसेवक शहबाज काझी यांनी केले. आभार प्रा. जावेद काझी यांनी मानले.

फोटो ओळ :- नळदुर्ग येथे आयोजित काँग्रेसच्या बुथ कमिटीच्या मेळाव्यात बोलताना आ. बसवराज पाटील
 
Top