उमरगा :- तालुक्यातील मुरुमचे प्रा.डॉ. महेश मोटे यांना नुकताच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आले. ते श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागात गेल्या २२ वर्षापासून कार्यरत आहेत.
कर्नाटक राज्यातील सिमोगा येथील आंतरराष्ट्रीय नेहरु इन्डोर स्टेडियम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पीनशिप-२०१८ व दुसऱ्या आंतरराष्ट्रीय प्युपिल्स ऑलिम्पिक स्पर्धा-२०१८ दि. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या उद्घाटन कार्याक्रमात डॉ.महेश मोटे यांना अमेरिकेचे मोयुली सोटोकॉन वर्ल्ड कराटे डो असोसिएशनचे संस्थापक प्रमुख पीइरेरे एफ.मोयुली यांच्या हस्ते 'पीओए नॅशनल अॅवार्ड-२०१८'चा सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्ल गौरविण्यात आले.
यावेळी मलेशियाचे सुकी के.आनंथन, श्रीलंकेचे मीडोंजा सोटोकॉन कराटे असोसिएशनचे अध्यक्ष डब्ल्यु.ए.एस.पी.जे.मीडोंजा, नेपाळचे एशियन प्युपिल्स ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अरुण कारकी, गुबान देशाचे अगाया, संयोजन समन्वयक एस.एल.विनोद, प्युपिल्स ऑलंपिक असोसिएशन सरचिटणीस महमंदरफी शेख, सायराभानु शेख, एम.अल्ताफ पाशा आदीजण उपस्थित होते.
