शहीद मेजर कौस्तुभ राणे या वीर जवानास विनम्र अभिवादन करणारी कविता लिहली आहे आपल्या तुळजापूर लाईव्ह च्या वाचकांसाठी श्रीमती रेजा पायाळ यांनी....
डोळं भरुन आल....
कौस्तूभच कौतुक सगळीकड झाल
अॉन लाईन सगळ्यांच डोळं भरुन आल.....
बाबांना भेटण्याचा चिमुकल्यान घेतला ध्यास!
आईच्या पोटात सांगा आता जाईल का घास !!
ध्वज हाती घेता तिच काळीज करपून गेल!
अॉन लाईन सगळ्यांच डोळं भरुन
आल ........
आपणच यातले अन आपणच त्यातले
दंगलीत सगळ्यांनी दगड हातात होते घेतले
प्रेतावर राखी ठेऊन तिन रक्षाबंधन केल
अॉन लाईन सगळ्यांच डोळं भरुन आल...
जात पात धर्म काही असतो का त्यांना
हसत हसत मातीत एकरुप होण माहित असत त्यांना ..
कृतघ्ण आमच मन पार्टीत रंगून गेल
अॉन लाईन सगळ्यांच डोळं भरुन आल .........
लढतात ते तुमच्यासाठी ठेवा थोडे तरी भान
आपसात लढलात तर राहील का त्यांना त्राण
याच मातीत पुन्हा जन्मणार अखेरच वचन त्यानं दिल
अॉन लाईन सगळ्यांच डोळं भरुन आल .....
--------------------------------------
- श्रीमती रेजा पायाळ
मुख्याध्यापक
नगर परिषद शाळा क्र .-१
कळंब
----------------------------------------