नळदुर्ग :- हिंदू-मुस्लिम बांधवांनी आगामी येणारे सण, उत्सव शांततेत साजरा करुन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी केले.
नळदुर्ग पोलीस ठाण्यात शनिवार रोजी बकरी ईद निमित्ताने शांतता कमिटी ची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना मिरकले हे बोलत होते.
या बैठकीस हाफीज सय्यद मैनोद्दीन जाहगिरदार, हाफीज सय्यद नियामतुल्ला ईनामदार, आलेम महुमद रजा, ईद मिलाद कमिटीचे प्रमुख सलीम शेख, पोलीस पाटील सुर्यकांत पाटील, शिवाजीराव मोरे, अशोक पुदाले, शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, सिराज काझी, फारुख कुरेशी, नगरपालिकेचे खलील शेख, मुनिर शेख यांच्यासह नळदुर्ग व परिसरातील हाफीज, आलेम, विविध मशिदचे पेशेईमाम व नागरिक उपस्थित होते.
नळदुर्ग शहरवासियांच्यावतीने हाफीज सय्यद मैनोद्दीन जाहगिरदार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचा सत्कार केला. यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, ज्ञानेश्वर राडकर, अनिल खोडेवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज पटेल यांनी केले तर आभार अनिल खोडेवाड यानी मानले.