शाहीन मासुलदार
नळदुर्ग :- येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक होऊन  महिना होण्याआधीच राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षा मासुलदार यांच्या विरोधात  राष्ट्रवादीच्या बंडखोर गटातील नगरसेविका अंबुबाई दासकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत उपनगराध्यक्ष मासुलदार यांनी पुढील सुनावणी दि. १४ ऑगस्ट रोजी होऊन निकाल लागे पर्यंत उपनगराध्यक्षपदी राहू नये, अशा राज्यमंञ्याच्या तात्पुरत्या आदेशाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नळदुर्ग नगरपालिकेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष नितीन कासार यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी बंडखोरी करून राष्ट्रवादीच्याच अंबुबाई दासकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. माञ पीठासीन आधिकारी तथा नगराध्यक्षा रेखा जगदाळे यांच्या निर्णायक मताने शाहीन मासुलदार या  उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. यानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या बंडखोर उमेदार अंबुबाई दासकर यांनी राज्यमंत्र्याकडे अपील दाखल करून मासुलदार यांच्या निवडीला राज्यमंत्र्याकडे आव्हान दिले होते. त्यानुसार राज्यमंत्र्यानी शुक्रवार‍ दि. 3 ऑगस्ट रोजी या तक्रारीची दखल घेवून निकाल लागेपर्यंत उपनगराध्यक्ष शाहीन मासुलदार यांनी उपनगराध्यक्षपदी विराजमान होऊ नये व याबाबत  राज्यमंञ्याच्या दालनात १४ आँगस्ट रोजी सुनावणी होणार  आहे. या सुनावणीनंतर नळदुर्गमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

 
Top