लोहारा (इकबाल मुल्ला) :
लोहारा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व शंकरराव जावळे पाटील पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकराव जावळे पाटील यांनी राज्याचे सहकार मंत्री सुभाष बापु देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे दि.5 ऑगस्ट रोजी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी प्रमुख म्हणुन युवा नेते रोहन देशमुख उपस्थित होते.
दिनकराव जावळे पाटील यांचा लोहारा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे.यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यामुळे लोहारा तालुक्यात रॉष्ट्रवादी कॉग्रेसला मोठा फटका बसला आहे.
यावेळी लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक अजित ढोणे,कृषी उत्पन्न बाजार समिती उस्मानाबाद चे तज्ञ संचालक लिंबराज साळुंखे,
गुणवंतराव चव्हाण,अदि उपस्थित होते.