तुळजापूर (दास पाटील) : 

रविवार दि. १९ रोजी काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता व बूथकमिटी मेळावा तालुक्यातील सिंदफळ येथील मुद्गलेश्वर मंदीरात संपन्न झाला. या मेळाव्यास आ. मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, राजेंद्र शेरखाने, जी. प. सदस्य धीरज पाटील, मुकुंद डोंगरे, सभापती शिवाजी गायकवाड,  माजी सभापती संतोष बोबडे, अमर मगर यांच्यासह मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

तसेच येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. काँग्रेस पक्षाने पंचायत समिती व आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याने तालुक्यात झालेली विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोचवावी, आणि पुनश्च काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.धीरज पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरणाप्पा कबाडे यांनी केले. 

कार्यक्रमाच्या समारोपात आ. चव्हाण यांनी विविध गावातील उपस्थित सरपंचांकडून विकासकामाचा आढावा घेतला. अपूर्ण कामांची चौकशी करून त्याचा योग्य पाठपुरावा करावा, अशा सुचना केल्या. 

यावेळी सज्जनराव साळुंके, भारत कदम, अनंत कोंडो, राजाभाऊ शेंडगे दिपक सोनवणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 
Top