उस्मानाबाद :- धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी मराठवाड्याचे योगदान व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी धनगर समाजाच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत सोमवार दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत करण्यात आली आहे.
या बैठकीस धनगर समाजाचे रामभाऊ वडकुते, रगदडे मामा, लहु शेवाळे, आदी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस धनगर समाजातील जास्तीत जास्त समाजबाधवांनी उपस्थित रहावे , असे आवाहन दत्ता बंडगर, भारत डोलारे, खंडेराव चौरे, अॅड.दशरथ कोलेकर, तानाजी सोनटक्के, सोमनाथ लांडगे, दत्ता सोनटक्के, बालकृष्ण गोरे, अनिल चादरे आदींनी केले आहे.