तुळजापूर (दास पाटील) :-

विंदा करंदीकर जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त  रामवरदायिनी प्राथमिक विद्यामंदिर तुळजापूर येथे गुरुवार दि. २३ रोजी कवी देविदास सौदागर यांनी पुस्तके भेट दिली. तसेच याप्रसंगी विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी रेखाटलेली प्रतिमाही भेट दिली.

याप्रसंगी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिवणे यांनी, वाचनसंस्कृती जपणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता असे उपक्रम हाती घेऊन वाचनसंस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच कवी सौदागर यांच्या या आगळ्या वेेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा एक लहानसा प्रयत्न म्हणून मी हा उपक्रम करत अाहे. असे मनोगत कवी देविदास सौदागर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

कवी देविदास सौदागर यांचा कर्णाच्या मनातलं .. हा कवितासंग्रह काही महिन्यापूर्वी प्रकाशित झाला आहे. विविध कवीसंमेलनात त्यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले आहे. याचबरोबर विविध वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंकातून त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे.

विविध मासिकांतून प्रकाशित झालेल्या कवितांच्या मानधनातून पुस्तके घेऊन त्यांनी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त रामवरदायिनी शाळेस भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम घेतला. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या उपस्थित होते.
 
Top