तुळजापूर :- हागणदारी मुक्त गावांचे सातत्य राखणे कामी केद्रशासनाच्या वतीने गुरुवार दि. 24 ऑगस्ट रोजी राजस्थान राज्यातील येथे एक दिवसीय कार्यशाळा होणार सून या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील एकूण आठ सदस्या पैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मधुकर देशमुख (स्व.व पा.पू.) व तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजी गायकवाड सभापती पंचायत समिती तुळजापूर यांची निवड झाली आहे.

देशातील अनेक राज्यातील आयएएस अधिकारी यांचेसमवेत हागणदारी मुक्त गावांचे सातत्य राखण्यासाठी एक आदर्श नियमावली व उपाययोजना बनवून सर्व राज्यत लागू करणे कामी हि कार्यशाळा आहे.

त्याचबरोबर सांगली जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, ठाणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमेनवार, अहमदनगर जि.प. चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, चंद्रपुर जि.प. चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, कोल्हापूर जि.प. च्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी मोरे, श्रीमती सुजाता सामंत यांचीही सदरील कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली आहे.

 
Top