कळंब  (भिकाजी जाधव) :-

पद्मश्री  विठ्ठलराव विखे पाटील  यांनी आशिया खंडातील सहकारी तत्वावरील साखर कारखाना प्रवरा नगर येथे सुरु केला व सहकाराची मुहुर्तमेढ रोवली, त्यांचे सहकार शिक्षण सामाजिक क्षेञातील योगदान मोलाचे आहे, असे मत कळंब तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील  यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

 दि. २५ ऑगस्ट रोजी व्यक्त केले पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त कळंब  तालुका कृषी अधिकारी कार्यालय  येथे पंचायत समिती कार्यालय  यांच्या वतीने शेत दिन म्हणून  साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतीमेचे पुजन व पुष्पहार आर्पण करण्यात आले.

पुढे बोलताना आशोक संसारे म्हणाले की, उन्नत शेती प्रगत शेतकरी यासाठी कार्याची गरज सांगुन कर्मचारी यांनी शासनाच्या योजना शेतकर्यापर्यत पोहचविणे व शेतकर्यानी याचा लाभ घेणे गरजेचे आसल्याचे सांगितले. पद्मश्री विठठलराव विखे पाटील यांच्या कार्याची व कृषी विकासाच्या योजनांची माहीती दिली.

यावेळी अरुण वसवडे कृषी अधिकारी ,विरेश अंधारे (कृषी अधिकारी पंचायत समिती कळंब)निवास शिंदे विस्तार अधिकारी ,नंदकुमार कदम ,मोहन बंडगर (विस्तार अधिकारी ), पी एल कांबळे, सचिन क्षिरसागर, पञकार माधवसिंग राजपुत यांच्यासह  अधिकारी ,कर्मचारी यांची उपस्थिती होती.  आभार कृषी अधिकारी आरुण वसवडे यांनी मांडले.
 
Top