उस्मानाबाद :- कळंब तालुक्यातील नायगाव येथे ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाच्या तरतुदीतून अंगणवाडीसाठी गॅस व एलसीडी टीव्ही संचाचे वाटप जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मंगळवार दि. 31 जुलै 2018 रोजी नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आरोग्यावर धुरांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून पोषण आहार शिजविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून गॅस व अध्यापनासाठी टीव्ही संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी कळंब पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय साळूंके, सरपंच सौ. वनमाला पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक पंडीतराव टेकाळे, ग्रामपंचायत सदस्य संगपाल साखळे, भरत गरड, बापू गायकवाड, गोरोबा शितोळे, व्यंकट माळी, नारायण पाटील, अनिल माळी, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेरमन सुधाकर शितोळे, प्रल्हाद शितोळे, भारत पाटील, बाबासाहेब शितोळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ग्रामसेवक श्री. झांबरे, राजाभाऊ पाटील, अंगणवाडी सेवीका श्रीमती. शितोळो, ओव्हाळ, साखळे, चव्हाण, कोळी, मेनकुदळे आदीसह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.