काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मुस्लिम बांधव मुस्लिम धर्माचे पवित्र स्थान मक्का मदीनाला जात असल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
आयुष्यात एकदा तरी मक्का मदीनाला जावे ही भावना मनाशी धरून जगभरातील सर्व मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान व मुस्लिम लोकांचे पवित्र शहर सौदी अरेबियातील मक्का मदीनाला काटी येथील अंबीर काशिम कुरेशी, फातिमाबी अंबीर कुरेशी, इलाई अंबीर कुरेशी, अब्दुल हमीद फरीद कुरेशी, रुबिना अब्दुल हमीद कुरेशी, अन्सार अब्दुल हमीद कुरेशी, वजीर शमशोद्दीन फकीर हे सातजण भाविक मक्केला जात असल्याने तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गायकवाड, माजी सभापती संतोष बोबडे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप साळुंके, अतुल सराफ, पत्रकार उमाजी गायकवाड, करीम बेग, सुहास साळुंके, बाळासाहेब भाले, अहमद पठाण, कय्युम कुरेशी, वशीम कुरेशी, अहमद पठाण, रफीक कुरेशी, वशीम कुरेशी, कय्युम कुरेशी, सिकंदर कुरेशी आदीसह अलकुरेश गृपच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.