उस्मानाबाद :- सुराग ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचे मुख्य विश्वस्त शशिकांत चितळे व स्मॅश इलेक्ट्रॉनिक्स या पुणे येथील उद्योग समुहाचे प्रमुख यांच्या उदार देणगीतून उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ विद्यार्थी/विद्यार्थीनींना व दोन आजारी व्यक्तींना जवळजवळ एक लाख रुपयाची आर्थिक मदत वाटप करण्यात आली आहे.
दरवर्षी अशा मदती निधीचे वाटप सुराग ट्रस्ट द्वारा ब्राह्मणसेवा संघ या सेवाभावी व समाजउपयोगी संस्थेमार्फत करण्यात येते. यावर्षी सुराग ट्रस्ट या संस्थेमार्फत आलेले ह्या धनादेशाचे वाटप धारासूर मर्दिनी संस्थेचे उपाध्यक्ष व श्री राम मंदिर ट्रस्ट समर्थ नगरचे अध्यक्ष श्री.श्रीपाद पाटील (बापूसाहेब देशपांडे) व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.अमृता देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक शं.कुलकर्णी (बेंबळीकर) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अनुराधा कुलकर्णी उपस्थित होत्या. अभ्यासक्रमाच्या सुरूवातीच्या काळात भरीव आर्थिक मदत मिळाल्यामुळे लाभधारक विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरणा आहे. या प्रसंगी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक शं.कुलकर्णी (बेंबळीकर) यांनी श्री.बापूसाहेब देशपांडे व श्रीकांत पाटील, श्रीराम मेडिकल यांचे आभार व्यक्त केले. संस्थेच्या अत्यंत कठीण काळात या दोघांनी परिश्रम घेऊन संस्था कार्यरत ठेवल्या त्याबद्दल आभार व्यक्त केले.