खानापूर :- तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे साहित्यसम्राट तरुण मंडळाच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
खानापूर ता. तुळजापूर येथील साहित्यसम्राट तरुण मंडळाच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य मिरवणुकीस अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पोलीस पाटील अमोल हिप्परगे, ग्रामपंचायत सदस्य बलभीम गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रारंभ करण्यात आला. गावातील प्रमुख रस्त्यावर हि मिरवणुक काढून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये इटकळ, काटगाव, सोलापूर सह आदी ठिकाणाहून कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणुक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष वैभव कांबळे, उपाध्यक्ष दादाराव सगट, अजय कांबळे, महादेव सगट, आनंदा कांबळे, चंद्रकांत साळुंके, ज्ञानेश्वर कांबळे, आगाश सगट, आकाश कांबळे, यशवंत बनसोडे, आप्पाराव कांबळे, मधुकर देडे, चंद्रकांत कांबळे, लिंबाजी क्षिरसागर आदींनी परिश्रम घेतले.