तुळजापूर : लोहारा येथील श्रीगिरे हॉस्पिटल व प्रसूतिगृह येथील डॉ. सौ.रुपाली श्रीगिरे यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर लग्नानंतर तब्बल 15 वर्षांने बारुळ ता.तुळजापूर येथील रणदिवे दामपत्यास अपत्य प्राप्ती झाली.
सौ.गोदावरी प्रकाश रणदिवे रा.बारुळ ता.तुळजापूर येथील रहिवाशी असुन गरीब दामपत्यास लग्नानंतर 15 वर्ष झाले होते. परंतु बरीच वर्षे अपत्यप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी उपचार घेतले होते. तरी त्यांना कुठेही यश आले नाही. डॉ. सौ.रुपाली श्रीगिरे यांनी सदर दामपत्याचा योग्य त्या तपासण्या करून औषध उपचार सुरू केले. तीन ते चार महिन्यातच उपचाराला यश आले. त्यानंतर 9 महिने योग्य औषध उपचार घेतल्याने दि. 12 सप्टेंबर रोजी श्रीगिरे हॉस्पिटल लोहारा येथे कन्यारत्न प्राप्त झाले .सदर दामपत्यानी डॉ. सौ.रुपाली श्रीगिरे यांचा सत्कार करून ऋण व्यक्त केले. रणदिवे दाम्पत्यांनी डॉ रुपाली श्रीगिरे यांचा देवीचा फोटो देवुन सत्कार केला.
