तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर येथील अपसिंगा रोडवर सोमनाथ कांबळे (२७) रा. पोमादेवी जवळगा, ता. औसा पाच अनोळखी आरोपींनी पैशाची मागणी करत केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी विजय संजय कळबंडे, वय १९ रा. उजनी ता.औसा जि.लातूर याच्या फिर्यादीवरून पाच जणाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली असून अदयाप एकजण फरार आहे. 

याप्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सदर प्रकरणातील फिर्यादी विजय कळबंडे आणि मयत सोमनाथ कांबळे हे त्यांच्या ताब्यातील आशोक लिलँन्ड पिकअप क्र. एम.एच. १२ ए एक्स ५०११मध्ये मध्ये बसून तुळजापुर येथील लातुर रोड कॉर्नर येथे आराम करत असतान अनोळखी आरोपीपैकी एकजण करिज्मा मोटार सायकलवर आणि उर्वरीत पायी चालत गाडी आले. गाडीच्या दाराच्या काचेवरती हाताने थाप मारल्याने सोमनाथ याने गाडीचे दार उघडताच दोन आरोपींनी त्यास हाताने मारहाण व झोंबाझोबी करत गाडीचे पाठी मागे हौदात घेऊन गेले. उर्वरीत तीन आरोपी पैकी दोन आरोपी डाव्या बाजूने गाडीत बसले व एकजण ड्रायव्हर बाजूने फिर्यादी संजय कळबंडेजवळ येऊन बसला. त्यांनी फिर्यादीच्या खिशातील पाॅकेट व त्यामध्ये असलेली रोख रक्कम २५००/- रुपये व ओप्पो कपंनीचा मोबाईल अंदाजे किंमत रु.३००० असा एकूण ५५००/- रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. समोर बसलेल्या दुसऱ्या आरोपीने फिर्यादीची मान खाली दाबून धरुन आरोपींनी त्यास पन्नास हजार रुपये द्या, नाहीतर दोघांना जिवे मारुन टाकू, असे म्हणत त्यांचे अपहरण करुन सदरची पिकअप तुळजापूर शहरातून अपसिंगा शिवार येथे निर्जन स्थळी नेण्यात आले.  तेथे फिर्यादीस गाडीच्या खाली उतरवले आणि मयत सोमनाथ यास मारहाण करुन गाडीबाहेर रोडवर फेकून दिले. फिर्यादी कळबंडे याने मयताच्या नाकातोंडातून आलेले रक्त पाहून स्व:ताचा जिव वाचविण्याकरिता तेथून अंधारातून पळ काढला. याप्रकरणाची खबर तुळजापूर पोलिसांना मिळताच सदर घटनास्थळी धाव घेतल्यावर तेथे मयत सोमनाथ कांबळे याचा मृतदेह आढळून आला.

या गुन्ह्याबाबत तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधीत घटनेतील पाच संशयीतांपैकी लक्ष्मण बळीराम ढवळे (२३) संभाजीनगर, ,हडको, तुळजापूर, विक्की रविंद्र कोरडे (२५) रा. आनंदनगर, हडको, तुळजापूर, नितीन वसंतराव हेडे (२५), अजय बंडू क्षीरसागर (२१) रा. मातंगनगर, तुळजापूर यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पाचवा आरोपी अतिश पोपट भांगे अद्याप फरार आहे.

फिर्यादी विजय कळबंडे याच्या फिर्यादीवरून पाच आरोपीविरोधात गु.र.न. २९०/१८ भा. दं .वि. ३६३, ३९६ अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top