अक्कलकोट : रियाज सय्यद
माओवाद आता काही भागांपुरता मर्यादीत नराहता तो आपल्या दारांपर्यँत आला आहे.दलित माओवादी बनत नसुन माओवादी आंबेडकरीवाद याचा बुरखा पांघरून त्यांच्या प्रश्नांना हात घालुन तरूणांना जाळयात ओढु पाहतात.त्यांना दलित संघटना नामशेष करावयाच्या आहेत.ते पोलीसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न करत असतात.यासाठी काळाची पावले ओळखुन माओवाद रोखण्यासाठी समाजात जागृती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नक्षल चळवळीच्या अभ्यासिका कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले. शहरी नक्षलवाद या विषयावर ते विवेकांनद गणेशोत्सव व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना बोलत होत्या.
प्रांरभी जेष्ठ नागरिक मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचा प्रांरभ करण्यात आला.यावेळी महर्षि विवेकांनद संस्थेचे मल्लिनाथ कल्याणशेटटी,जेष्ठ नागरिक अड.विलास फुटाणे,सुभाष गडसिंग,बाबासाहेब निंबाळकर, मुकुंद पतकी, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेटटी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
पुढे बोलताना कॅप्टन स्मिता गायकवाड म्हणाला, माओवादयांनी लोकांना भुलविले आहे.त्यांच्या समर्थनार्थ पुढे येणा-या लोकांवर कारवाई होत नसल्याने त्यांना अनासायासे बळ मिळत आहे.कोणताही दलित माओवादी बनत नाही कारण संविधानाशी त्याचे नाते भाविनक असते व संविधानाच्या विरोधात काम करू शकत नाही.पण माओवादी बुरखा पांघरून त्यांचे प्रश्न सोडविल्यासारखे करून तरूणांना आपल्या जाळयात ओढत आहेत.हे धोकादायक आहे.माओवादयांना दलितांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांच्या संघटना नामशेष करावयाच्या आहेत.तोडगा न काढता ते त्याचे भांडवल करून दलित तरूण तरूणींना भडकवण्याचे काम करत आहेत यासाठी समाजात मोठया प्रमाणात जागृती होणे गरजेचे आहे.विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी ,अशोक येणगुरे,शशिकांत लिंबीतोटे,संतोष जिरोळे,मल्लिनाथ मसुती,गुरुपादप्पा आळगी ,नितीन पाटील,महेश कापसे, चंद्रकांत दसले, एस.व्ही.कलबुर्गी, व्ही.एस.तळवार, मलकप्पा भरमशेटटी, व्ही.एस. बिराजदार, एस.बी.माने, आदीसह रसिक श्रोते उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक के.डी.सुर्वे,विलास तळवार,गुरूनाथ गवंडी,राजेश पडवळकर,लोकापुरे आदीसह महिला नागरिक उपस्थित होते.
