अक्कलकोट : रियाज सय्यद
अक्कलकोट तालुक्यातील मोटयाळ येथे मोहरम उत्सव सुरु झाला आहे. त्यानिमित्ताने रविवार रोजी संध्याकाळी गावात सवाद्य अतिशय भक्तिभावाने पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून हिंदू-मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणानिमित्त धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यामिक परंपरा असलेला मोहरम सण मोट्याळमध्ये धार्मिक एेक्याचे प्रतिक म्हणून परिचित आहे . सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित येत मोहरम उत्सव साजरा केला जातो . या निमित्ताने अजूबाजुच्या पंचक्रोशीतील अनेक नागरिक दर्शनांसाठी येतात. त्या निमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे. गावातील नागरिक गेल्या अनेक वर्षा पासून मिळून मिसळून हा सण गुण्यागोविंदाने व एकोप्याने साजरा करतात.
