काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मोरया प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रारंभी सरपंच आदेश कोळी व हेड कॉन्स्टेबल भोसले यांच्या हस्ते गणरायाच्या मुर्तीचे व संत घाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर स्वच्छता अभियानांतर्गत खंडोबा मंदीर परिसर, दत्त चौक, ग्रामपंचायत परिसर, बसस्थानक, मोगल गल्ली, धनगर गल्ली, काझी गल्ली, शाळेचा परिसर मोरया गृपच्या सदस्यांनी स्वच्छ केला. तसेच गवतावर तननाशक फवारणी केली. या मोहिमेत मोरया प्रतिष्ठानचे संस्थापक सुरज साळुंके, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कोळी, उपाध्यक्ष अजय शिंदे, सुमित शिंदे, अक्षय नारगुडे, आकाश शिंदे, दादा साळुंके, ऋषिकेश साळुंके, गणेश थिटे, रोहित शिंदे, समीर पठाण, शुभम हांडे, अभिषेक ढेकणे, वैष्णव साळुंके, बादल साळुंके, अविनाश साळुंके, नागेश साळुंके,आदी सदस्यांनी सहभाग नोंदवला होता.
यावेळी सरपंच आदेश कोळी यांनी मंडळाचे कौतुक केले. यावेळी सरपंच आदेश कोळी, सुजित हंगरगेकर, हेड कॉन्स्टेबल भोसले, शामराव आगलावे, प्रदीप साळुंके, अतुल सराफ, करीम बेग, सुहास साळुंके, अविनाश वाडकर, ज्ञानेश्वर गुरव, नामदेव साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हिडिओ पहा -
व्हिडिओ पहा -

