तुळजापुर : कुमार नाईकवाडी

श्री गणरायाच्या आगमना नंतर शनिवार रोजी सायंकाळी गौरी महालक्ष्मी मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात आगमन झाले. त्यानंतर रविवार दि. १६ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता घरोघरी  श्री गौरी लक्ष्मी ची यथा सांग पुजा करुन श्री महालक्ष्मी मातेस स्वादीष्ट प्रकारचे महाभोजन घालण्यात येवून सहकुटुंब सहपरिवार श्री महालक्ष्मी  मातेची महा आरती करण्यात आली.

या वेळी परिवारातील सदस्यानी श्री महालक्ष्मी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. पारंपारिक पद्धतीने तुळजापुरात श्री  महालक्ष्मी  सन मोठ्या भक्तीमय वातावरणात सन उत्साहात साजरा केला. सकाळ पासुनच बाजार पेठा मध्ये श्री महालक्ष्मी  साठी लागणाऱ्या  साहित्यासाठी  एकच  गर्दी केली होती.बाजार पेठा मध्ये महालक्ष्मी समोर विविध  खेळणीसह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी  बाजारामध्ये  नागरीकांची झुंबड उडाली होती. अतिशय धार्मिक पद्धतीने श्री  महालक्ष्मी सन शहर वासियांनी मोठ्या आनंदात साजरा केला.
 
Top