नळदुर्ग : उस्मानाबाद जिल्ह्याची मागास जिल्हा म्हणून आसलेली ओळख पुसून काढण्यासाठी समर्पक भावनाने काम करणार असून गावक-यांनी आपल्या गावाच्या विकासाकरीता सामुहिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार सुजितसिंह ठाकूर वागदरी ता. तुळजापूर येथे यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे शनिवार दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रीसंत सदगुरु भवानसिंग महाराज यांच्या दर्शनकरीता व शिवगणेश तरुण मंडळाच्या आयोजित कार्यक्रमासाठी आ. ठाकूर हे आले होते. सर्वांनी एकञ येऊन कार्य केल्यास कितीही बिकट परिस्तीवर तोडगा निघतो गरज आहे ती एकञ येऊन काम करण्याची आसे आमदार ठाकुर म्हणाले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, उपाध्यक्ष देवानंद रोचकरी, तालुका अध्यक्ष सत्यवान सुरवसे, अँड. अनिल काळे, विजय शिंगाडे, साहेबराव घुगे, सुशांत भुमकर, पद्माकर घोडके, सचिन घोडके यांच्यासह वागदरीचे सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, शिवाजी मिटकर, किसन पाटील, ह.भ.प. राजकुमार पाटील कुंडलिक ठाकूर, भालचंद्र यादव, किशोर सुरवसे, प्रमोद सुर्यवंशी, मल्लिनाथ बिराजदार, विलास बिराजदार, बाबुराव बिराजदार, प्रमोद बिराजदार, राजकुमार पवार, चंद्रकांत वाघमारे, मकबुल शेख, जलिल शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उमाकांत मिटकर तर सुञसंचलन व आभार आमोल पाटील यांनी मानले.

