काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील अभिजित डोंगरे कुटूंबियांच्या वतीने जगभरातील अवघ्या जनाचे लाडके दैवत, कोटय़वधी भक्तगणांचे श्रध्दास्थान महालक्ष्मी अर्थात गौरी गणपतीचा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. गौरी दोन दिवस राहून तिसऱ्या दिवशी परत जातात त्यांना माहेरवाशीण म्हणून आपुलकीने त्यांचे स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते.
सालाबादप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील अभिजित दगडू डोंगरे कुटूंबियांच्या वतीने वर्षीही गौरी गणपतीचा सण साजरा करण्यात येत आहे. विविध ठिकाणी गौरी लक्ष्मी समोर, खेळणी, लाईटींग, आकर्षक सजावट, देखावे सादर केले जातात. परंतु डोंगरे कुटूंबियांच्या वतीने समाजाला भेडसावत असलेल्या प्रश्नावर आधारित गौरी समोर विविध प्रकारचे संदेश पोस्टरद्वारे लिहून समाजाला एक वेगळा संदेश दिला. वरचेवर मुलींचे घटते प्रमाण, पर्जन्यमान, प्लास्टिकचा प्रचंड वापर त्यापासून होणारे दुष्परिणाम या सर्व समाजाला भेडसावणार्या प्रश्नावर आधारित पोस्टर तयार करून समाजाला त्या माध्यमातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. गौरी लक्ष्मी समोर मांडण्यात आलेल्या संदेशात
- मुलगी वाचवा मुलगी शिकवा
आणि ऑलम्पिक ची पदके मिळावा!
- मी दगडात नाही की मूर्तीत नाही
- मी वृक्षात आहे माझे संगोपन करा!
- शिवरायांचे स्वराज्याचे -----सुराज्यात रूपांतर आपण सगळे मिळून करू
- मुलगी ही दोन्ही घरची पंचारती आहे
- आई ,बहीण ,पत्नी ,मैत्रीण पाहिजे, मग मुलगी का नको
- खुलण्याआधी कळी खुडू नाका
- मलाही उमलू द्या हो , हे जग पाहू द्या
- सुखी संसाराचे सूत्र
- कन्येलाच माना पुत्र
अशा प्रकारचे 20 ते 25 फलक लावून डोंगरे कुटूंबियांनी गौरी गणपतीची आरास केली आहे. त्यांनी दिलेल्या संदेशाचे कौतुक केले होत आहे.


