बीड : गणेश गिराम
जयहिंद गणेश मंडळ चौसाळा (ता.जि. बीड) यांच्या वतीने सालाबाजा प्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम गणपतीचे पुजन करुन रक्तदान शिबीरास सुरवात करण्यात आली.जयहिंद गणेश मंडळ अध्येक्षा सौ.मंगलताई राऊत यांनी प्रथम रक्तदान करून शिबीरास सुरवात केली.
जिवन अमृत रक्त पेडी जिल्हा रूगणालय बीड येथील डाॅ.राम मोहिते,श्री.येवले,श्री.प्रशांत सुकाळे,श्री.प्रकाश मस्के ,जहीर खान व सहकारी याची टिम या शिबीरा साठी आली होती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चौसाळा येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. अंकुश मंचुके व डाॅ.कैलास खाकरे व मंडळाचे सभासद डाॅ.सुदर्शन निनाळे व डाॅ. भिमराव पोकळे यांनी सर्वानी या शिबीरा याठी मोलचे सहकार्य केले या शिबीरात मंडळाचे आजी व माजी सभासद व पंचक्रोशीतीत गणेश भक्तानी या शिबीरात ३७ रक्तदात्यानी रक्तदान केले.
रक्तदात्याची नावे पुढील प्रमाणे आहेत - किरण सर्वज्ञ,अभिषेक पवार,राजु पवार,बबन निनाळे,सचिन खोबरे,प्रविण निनाळे,शिद्धेश्वर पवार, आशोक काळे,शेख सोहील,नितीन चौधरी,लक्ष्मण निनाळे,मुजावर अफरोज,विधाते रितेश,रोहीत जोगदंड,अभिजीत खतिले,अफरोज तांबोळी,प्रविन गुंजाळ,फेरोज तांबोळी,अमोल कळसकर.राम पवार,दिनेश चौधरी,सौ.विजयाताई निनाळे,नरेश वाघ,दशरथ निनाळे,विकास नाईकवाडे,कल्याण शिंदे,सचीन नाना चौधरे,उमेश खाकरे,रोशनकुमार खिवसरा,लक्ष्मण बोराडे,अमोल खडके,अर्जन अाप्पाचौधरे,सौ.सोनल बेदमुथ्था ,कैलास तोडकर,उमेश जोगदंड,शिवाजी मुळे सर,मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठल सर्वज्ञ . तसेच दि.२०/०९/२०१८ रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत आरोग्य /रक्तदाब व शुगर तपासणी शिबीर व राञी ९ ते ११ ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे चकलंबा यांची किर्तन सेवा होणार आहे, अशी माहीती मंडळाचे प्रसिध्दी प्रमुख सौ.सुजाता गणेश गिराम यानी दिली.
