तुळजापूर : कुमार नाईकवाडी

शहरातील शुक्रवार पेठ भागातील राजे संभाजी तरुण मंडळाची श्रींची विसर्जन मिरवणूक मंगळवार दि. १९ रोजी उत्साहात संपन्न झाली.


दुपारी ३ वा. मिरवणुकीचे उद्घाटन माजी राज्यमंत्री, आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवीचे महंत तुकोजीबुवा, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे, गोकुळ शिंदे , विनोद (पिटू) गंगणे, विशाल रोचकरी ,विजय कंदले, अविनाश गंगणे, राहुल खपले, आनंद  कंदले, अमर हंगरगेकर, निलेश रोचकरी, सचिन रसाळ,यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विशाल छत्रे, अध्यक्ष सचिन कदम, उपाध्यक्ष उदय अमृतराव, अतुल कदम, मिरवणूक प्रमुख राम छत्रे, सचिव महेश गरड, विशाल निंबाळकर, प्रविण शिंदे, अमित आरगडे, सुरज साठे, चेतन शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीही उपस्थिती होती.



शुक्रवार पेठ येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. किसान चौकी, साळुंके गल्ली, आर्य चौक, कमानवेस, मंगळवार पेठ, आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक या मार्गाने शहरातून ढोल ताशाच्या वाजतगाजत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. 


शहरातून कोणत्याही प्रकारची देणगी, वर्गणी गोळा न करता सभासदांच्या वर्गणीतून गणेशोत्सवात विविध सामाजीक उपक्रम पार पाडणारे मंडळ म्हणून संभाजी तरुण मंडळाची ओळख आहे. श्रींच्या रोजच्या आरतीसाठी प्रतिष्ठीत मान्यवरांसह समाजातील उपेक्षीत घटकांना आमंत्रीत करून आपले वेगळेपण या मंडळाने राखले आहे.
 
Top