तुळजापुर : कुमार नाईकवाडी
येथील सैनिकी विद्यालयाच्या मैदानात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत कुलस्वामिनी विदयालयातील 19 वर्षीय गटात मुलींनी तर 14 वर्ष गटात मुलांनी प्रथम तर 17 वर्ष गटात मुलांनी व मुलींनी द्वितीय क्रमांक तसेच लातूर विभागीय स्पर्धेत 14 वर्ष व 19 वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवत शालेय क्रीडाविश्वात आपला दबदबा कायम ठेवत यश संपादन केले.
यशस्वी संघास प्रा.गणेश बिराजदार, प्रा.संतोष कोठावळे, क्रीडाशिक्षक अनिल धोत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी यशस्वी खेळांचा सत्कार जेष्ठ पत्रकार अंबादास पोफळे यांच्या हस्ते करण्यात आला.
सर्व विजेते खेळाडूंचे संस्थेचे सचिव शिक्षणमहर्षी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरूजी, मुख्याध्यापक शिवाजी राठोड़, रविंद्र उपाशे, अणदुरकर, शिवशंकर जळकोटे, प्रा. प्रशांत भागवत, शिवपुत्र गुरव, युनुस पठाण, राजकुंमार मिटकरी, शिवाजी जगताप, बालाजी कांबळे, डॉ. हारळकर मैडम, गणेशिद्ध बिराजदार, क्रीडाशिक्षक अनिल धोत्रे यांनी अभिनंदन केले.
