नळदुर्ग : सचिन गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील नवचैतन्य तरुण गणेश मंडळ व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर आणि उमेद तुळजापूर यांच्यावतीने सामाजिक ऋणोत्सव गुणगौरव समारंभ घेण्यात आला.
चिकुंद्रा येथील नवचैतन्य तरुण गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक,व अध्यात्मिक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी गणेश मंडळाच्या वतीने 'कापडी बॅग व शेतीकाम याकरिता वापरावयाची वस्त्र निर्मिती ' यासाठी पाच दिवसाचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला .या प्रशिक्षणातून यशस्वीपणे कापडी पिशव्या व शेती काम करताना वापरावयाची वस्त्र निर्मिती करणाऱ्या यशस्वी महिलांना कृषी विज्ञान केंद्र व नवचैतन्य तरुण गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक ऋणोत्सव गुणगौरव समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील माजी सैनिक राजेंद्र मोटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सचिन सूर्यवंशी ग्रह विज्ञान शास्त्रज्ञ प्रा .वर्षा मरवाळीकर, आर पी कॉलेज उस्मानाबादचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ.हणमंत सपकाळ, प्रा. राजा जगताप, स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या राणी शिराळ, विजय प्रकाशनचे संस्थापक संजय देडे, कवी प्रदीप पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, उमेदच्या समूह संसाधन व्यक्ती केशर जाधवर, सहशिक्षक महादेव गरड, श्रीमती गिरी, लक्ष्मण गायकवाड, मंडळाचे संस्थापक सत्यवान गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात उत्कृष्ट कापडी पिशव्यांचे उत्पादन करणाऱ्या केशर जाधवर, रेखा जाधवर, अंजली गायकवाड, रोहिणी पवार, प्रतिभा मोटे, महादेवी गरड, साधना मोटे, शालिनी मोटे, सविता गरड यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय या कार्यक्रमात लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले .यावेळी प्रा. सचिन सूर्यवंशी प्रा. वर्षा मरवाळीकर डॉ. हणमंत सपकाळ ,प्रा.राजा जगताप, राणी शिराळ, संजय देडे ,भैरवनाथ कानडे ,प्रदीप पाटील आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सत्यवान गायकवाड यांनी केले या कार्यक्रमास श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी ,बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
