तुळजापुर : कुमार नाईकवाडी

ढोकेश्वर मल्ट्री स्टेट अर्बन काँ आँफ, क्रेडीन सोसायटी शाखा लि.तुळजापुर येथे ठेवीदारांना बँके मध्ये मुदत ठेव योजना व आदीसह इतर योजना राबवुन इतर बँका पेक्षा जादा व्याजदर देतो असे आमिष दाखवुन बँकेतील ठेवीदारांना 45 लाख 36 हजार 545 रुपयास चुना लावल्याची घटना घडल्याने तुळजापुरात एकच खळबळ  उडाली आहे. याबाबत बँकेच्या व्यवस्थापक बँक मँनेजर ने तुळजापुर पोलीस ठाण्यात १२ जणा विरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना घडली.

या बाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी की, दि.11/6/ 2016 पासुन ते दि.15/9/2018 पर्यंत ढोकेश्वर मल्ट्री स्टेट अर्बन काँ आँफ क्रेडीट सोसायटी लि.शाखा तुळजापुर येथील बँकेच्या माध्यमातून ठेविदाराना,वेग वेगळी स्कीमची माहिती सांगुन जादा व्याजदर देतो म्हणून आरोपी भाऊसाहेब इंद्रराव शिंदे [ बँकेचा व्हा चेरमन]  दताञय नारायण बोरसे [बँकेचा सेक्रेटरी ] शिवाजी बाबुराव जाधव , शंकर शिवराम शिंदे,  भास्कर तुकाराम खुर्दे, रफीक महमद शेख, परसराम विठोबा काळे,संतोष चद्रंकांत आहीरे,विठ्ठल  रंगनाथ वाघ, वैशाली सतिश काळे,गंगुबाई संजय खताळे हे सर्वजन बँकेचे सदस्य आहेत हे सर्व रा.स्टेशन रोड लासलगाव ता.निफाड जि.नाशिक येथील आहेत या बाराजनानी संगनमत करुन ढोकेश्वर मल्ट्री स्टेट बँकेच्या माध्यमातून ठेवीदाराना बँके मध्ये मुदत ठेव योजना,दाम दुप्पट योजना,पेन्शन योजना आर.डी.पिग्मी इत्यादी सह स्कीमची माहिती सांगुन बँकेच्या वेगवेगळ्या स्किम मध्ये इतर बँका पेक्षा जादा व्याजदर देतो म्हणून असे म्हणुन बँकेच्या ग्राहकांना आमीष दाखवून नमुद आरोपीतानी 45 लाख 36 हजार 345 रक्कमेची ची आफरातफर केली सदरील या  बँकेचा मँनेजर नारायण देविदास शिंदे रा.जवाहर गल्ली तुळजापुर यांच्या फिर्यादीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात १२आरोपीच्या विरोधात  गु.र.न.289/18 कलम 420, 409 34 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास उपपोलीस निरीक्षक अनुसया मँडम करीत आहेत.

 
Top