स्थळ -  खा की कार्यालय 
येळ - खाऊन पिचीक करण्याची
पाञ - (तेच आपले दोन्हीकडून  घ्या म्हणणारे) घेणोबा, हानोबा, खानोबा

(नेहमी बंद आसलेला किंवा नुसता ताप नको म्हणून रिसिव्हर बाजूला ठेवतात तो) फोन खणाणतो.. 

घेणोबा - हँलो मी ..., बोला 

पल्याडाला - सायेब मी..., हिथ बंदी असूनही तोंडानं रस्ता, भींती  रंगवण्याच आयटम लई हाय बगा..., तेवढ रेड मारा...

घेणोबा - सर्व खा की म्हणणा-या सहकार्याना सांगतात.

सर्वजन मोहीमेवर निघतात.


बाहेर पडताना एक एक जण गावातील विविध चौकात आसलेल्या आपापल्या  आवडत्या (दोन बाय दोनच्या पञ्याच्या डबा) ठिकाणहून चैतन्य चुर्ण घेतात. आणि सर्व टिम मिशनसाठी निघतात.

थोड्या वेळाने एका ठिकाणी रेड मारून बंदी असलेले चैतन्य  चुरणाचे असंख्य पोते जप्त करतात..

पुन्हा आपल्या पराक्रमाची शिदोरी घेऊन आपल्या गडावर परत येतात. माञ रस्त्यात असंख्य ठिकाणी पोत्यातील चैतन्य चुर्ण रस्त्यावरील आनेक ठिकाणी  आपल्या भाऊबंदाच्या (सु)वासाने मंञ मुग्ध होतात. ते सर्व चारचाकीवरून प्रवास करत  आसताना रस्त्यात आपले भाऊबंद माञ दुचाकीवरून प्रवास करताना पाहून थोडे गर्वाने खुश होतात.   

खा कीच्या कार्यालयात माञ  मोजदाद,इतर सोपस्कर होऊन या चैतन्य चुर्णाचे दहन करण्याचे ठरते. आता माञ चुर्णास आतिव दुःख होते. पाच दहा मिटरवर माञ सगळीकडे आपले भाऊबंद  सर्व मुलं, तरूण, प्रोढ, वयोवृद्ध माणवाच्या जिव्हेवर आरूढ होऊन मौन वृत्त धारण करण्यास, रस्ते, भींती सार्वजनिक ठिकाणे रंगवण्याचे राष्ट्रकार्य करत असताना आम्हाला आग्नीच्या स्वाधिन व्हावे लागणार याचे आतिव दुःख होत आहे.  गोवा,  हाय, बादशाह, गितांजली, विमल  या सर्व भाऊबंदाना शेवटचा निरोप पाठवतात. 

जाळण्यापुर्वी शेवटची इच्छा विचारताच इवलीशी पुडी पुढील प्रश्न विचारते, इथे चौका चौकात माझे भाऊबंद जनसेवा करत असताना माझेच दहन का?

प्रश्न गहन आहे उत्तर कोण देणार?

✒   घाटशिळचा वाटाड्या

 
Top