तुळजापूर : दास पाटील

तुळजाभवानी मंदीर संस्थान येथील सुरक्षारक्षक शाम राजेंद्र जाधव यास आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या दोषी सुरक्षा रक्षकावर व संबधित क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा. लि. मुंबई यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन तहसीलदार तुळजापूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष यांना देण्यात आले.

या निवेदनात नमूद केले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथील सुरक्षा रक्षक शाम राजेंद्र जाधव याला अपमानास्पद वागणूक देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे तुळजापूर येथील रमाबाई पांडागळे, मिनाक्षीबाई भोजने, सुरक्षा रक्षक पारधे, विनायक काळे, मल्लिकार्जुन भोजने, रणजीत भोजने, गुरुनाथ काळे, रमाबाई पांडागळे यांचा भाऊ, व इतर सुरक्षा रक्षकासह क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा.लि . मुंबई या कंपनीवर कारवाई करावी, संबधित कंपनी कर्मचारी नियुक्त करत असताना सदर कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी प्रवृत्तीची चौकशी व शहानिशा न करता नियुक्ती केली जाते. याप्रकरणी संबधित गुन्हा नोंद झालेल्या ९ कर्मचाऱ्यांवर आजतागायत मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी कोणतीही कार्यवाही न करता सेवेत कायम ठेवले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊनही संबधित कंपनी व मंदिर संस्थान कारवाई करण्याचे टाळत आहेत. या प्रकरणाची सी.आय.डी.मार्फत चौकशी करावी, अन्यथा येत्या आठ दिवसात मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.  

या निवेदनावर माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम, धर्मराज सावंत, वेदकुमार पेंदे, प्रमोद कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top