नळदुर्ग :  सचिन गायकवाड 

"गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" एसटी चा प्रवास सुखाचा प्रवास या ब्रीदवाक्यानुरूप खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. तुळजापूर आगारातील एसटी चा प्रवास सुखाचा प्रवास हे एसटी महामंडळातील  ब्रिंद वाक्य आहे. मात्र तुळजापूर आगारातील एसटी महामंडळातील ब्रिंद वाक्य लागू पडत नसल्याचे चित्र स्पष्ट आहे.   

एसटी महामंङळातील भंगारात आलेल्या बस प्रवाशी वाहतूक करत असताना पहायला मिळतात.त्यात ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या जास्त आसते त्यामुळे प्रवाशी करणाऱ्या प्रवाशांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. MH 20 - D- 9566 ही तुळजापूर आगारातील बस आहे. ही बस दि.15 रोजी तुळजापूर ते  नळदुर्ग दरम्यान ही बस प्रवाशी वाहतूक करत असताना या बसची दैनिय अवस्था पहायला मिळाली . बस चालकाच्या ङाव्या बाजुला व ङाव्या बाजुच्या आतील बाजूस बस चे काही भाग निकामी व दाव्यानी बांधले गेल्याचे चित्र समोर आले आहे. अशा अवस्थेत तुळजापूर ते नळदुर्ग ही बस तब्बल 60 किलोमीटर ये - जा करत आहे. तुळजापूर ते नळदुर्ग दरम्यान प्रवाशांन् बरोबर शालेय विद्यार्थीची ही  संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा पध्दतीने तुळजापूर आगारातील एसटी बस प्रवाशी वहातुक करत आहे. त्यामुळे प्रवाशी नागरीक व शालेय विद्यार्थी यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे.
 
Top