बीड : गणेश गिराम
परमेश्वराला भक्त आवडतात तो भक्तावर सतत प्रेम करतो.प्रेमच नव्हे तर तो सर्व भक्ताला त्याच्या दुखातुन सोडवुण त्याला मुक्ती ही देतो.देवाला भक्त आवडतात असे प्रतिपादन ह.भ.प.नामदेव महाराज कवडे यांनी आपल्या किर्तनातुन केले.
चौसाळा ता.जि. बीड येथे जय हिंद गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवात दैनंदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन केले सदर किर्तन किर्तनातुनह.भ.प. नामदेव महाराज कवडे यांनी परमेश्वर हा सर्वावर सारखेच प्रेम करतो तर तो दररोजच्या भक्ताच्या कामात हातभार लावतो व आपण गुरू प्रमाणे आपले कार्य पार पाडतो.भक्ताच्या कामा साठी देवआपले देवपण पण विसरतो.परिनामी जो त्यांची भक्ती करतो त्याला परमेश्वर सतत मदत करतो असे त्यानी विविध उदाहरने व दाखले देवुन स्पष्ट केले.
श्री गणेशाची आरती येथील प्रतिष्ठीत कपड्याचे व्यापारी श्री कचरु शेट लोढा यांचे प्रतिनीधी म्हणुन सौ.विमलताई भागवत चौधरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा.गणेश विजय गिराम यांनी केले तर गणपती पुजन व आभार सतेश ( बंडु )देवा खडके यांनी मानले.
तसेच सदर गणेश मंडळाच्या वतिने विविध कार्यक्रम व सात दिवस किर्तन महोत्सव राबविला जात आहे. तरी चौसाळा व परीसरातील सर्व गणेश भक्तानी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे अवाहन समस्त जय हिंदगणेश मंडळ यांनी केले आहे.
