नागय्या गुरलिंगय्या स्वामी 

जळकोट :

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) येथील एका किराणा दुकानदाराला चौघांनी वार तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. शेती करण्यासाठी अन्य व्यक्तिला मदत करत असल्यामुळे हा वाद झाला. याप्रकरणी नळदूर्ग पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अन्य आरोपी सध्या फरार आहेत. 

हंगरगा (नळ) येथील नागय्या गुरलिंगय्या स्वामी दि. ७ सप्टेंबरला स्वतःच्या किराणा दुकानात ग्राहकांना किराणा माल विकत बसले होते. त्यावेळी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी शिवशंकर आप्पाराव वाघोले, संजय शिवशंकर वाघोले, संतोष व्यंकटराव वाघोले, अरविंद वाघोले हे दुकानात आले. त्यांनी मठाच्या नागभूषण स्वामीला शेतीसाठी मदत का करतो, असे म्हणून संजय वाघोले यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकानाच्या बाहेर ओढून डोक्यात उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर तलवारीने वार केले. चौघांनी मिळून दुकानांची नासधूस करून आठ ते दहा हजार रुपयेही चोरले. याप्रकरणी उपचार घेऊन आल्यावर स्वामी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानंतर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपीस अटक करण्यात आली तर दोन फरार आहेत. 

 
Top