तुळजापुर : कुमार नाईकवाडी
ग्रामीण भागातील नविन पिढी सुसंस्कृत व चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आ.मधुकरराव चव्हाण यांनी केले.
तालुक्यातील वडगाव लाख ग्राम पंचायत च्या वतीने १४ व्या. वित्त आयोगा तुन वडगाव लाख जि.प.शाळेसाठी इलर्निग कक्ष, सोलार पंप व सी. सी. टि. व्हि कँमेरे बसवण्यात आले आहेत. या ई. लर्निग कक्षासह विविध विकास कामाचे उद्घाटन आ. चव्हाण यांच्या हस्ते आले. यावेळी सभापती शिवाजी गायकवाड, जि.प.सदस्य अॅड. धिरज पाटील, बालाजी बंडगर, पं.स.सदस्य शिवाजी गोरे, सरपंच राजेंद्र करंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. चव्हाण म्हणाले कि, गरीब विद्यार्थ्यांना दर्जदार व चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या पुढे हि विद्यार्थी व शाळेच्या सर्वागिंण विकासाठी प्रयत्न करण्यात येतील. महिला व मुलींच्या शिक्षण, संरक्षणासाठी गावातील तरुणांनी पुढे यावे असे आवाहन केले.
यावेळी साहेबराव करंडे,दादा चौधरी, विलास करंडे, सुनिल चव्हाण , सतिश करंडे, राजेंद्र मेटे ,केंद्र प्रमुख रामराव खलाटे, हरि जाधव, मुख्याद्यापक पवन सुर्यवंशी, सुरेश मेटे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव करंडे, उपाध्यक्ष राजेंद्र गाढवे, उपसरपंच राजेंद्र मेटे, मुख्याद्यापक संतोष हंगरगेकर, सतीश हुंडेकरी, जयश्री कुरुम, रेखा डाके , टी.एम.टारफे आदींनी परिश्रम घेतले.