मुरुम :
सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील भोसगा पाटी येथे रस्त्याकडेला असलेल्या साठवण तलावाजवळ एका अनोळखी महिलेचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा खून करून मारून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक केले जात आहे.
घटनेची माहिती मिळाल्यावरून मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेच्या तपास कामी कांही माग निघतो का यासाठी उस्मानाबाद येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
मुरूम पोलिसांकडून घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम चालू असून पोलीस तपासातून घटनेचा उलगडा होण्याबरोबरच घातपात की आणखी कांही हे अधिकच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.