तुळजापूर : कुमार नाईकवाडी

वायपट खर्च न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते अमर चोपदार विविध सामाजिक उपक्रम करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. या मध्ये शहरातील तुळजामाता अनाथ आश्रम येथे अनाथ मुलांना  विविध शालेय साहित्य व खाऊ वाटला, तसेच या निमित्ताने या आश्रम शाळेला कायमच मदत करण्याचे आश्वासन अमर नाना चोपदार व सर्व मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आले.. या नंतर तुळजापूर ग्रामीण रुग्णालय मधे फळे व बिस्कीट वाटण्यात आले. या वेळी रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी यांच्या वतीने अमर याना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष संदीप गंगणे, सचिन  कदम परमेश्वर, कार्याध्यक्ष अभिजित कदम, युवा नेते रत्नदिप भोसले, राहुल साठे, आप्पासाहेब पवार, दुर्गेश साळुंके, समर्थ पैलवान, सूरज जगदाळे, राजरत्न कदम, श्री आलट सर, डॉ शिरसिकर, डॉ राठोड, विकास आलकुंटे, गणेश कोळगे, विजय बोधले, ओंकार अपराध व सर्व मित्र परिवार आदि उपस्थित होते.
 
Top