चंद्रकांत तोडकरी 
तुळजापूर  : कुमार नाईकवाडी

तालुक्यातील आपसिंगा येथील चंद्रकांत महादेव तोडकरी यांना किडनीचा आजार असुन, त्यांना छातीत खरखर व दम भरत असल्यामुळे सोलापूर येथे घेवून जात असतांना रक्ताची उलटी झाली, त्यामुळे त्यांना परत तुळजापूर येथील शासकिय रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासुन मयत झाल्याचे सांगितल्यावरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यांत आली.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (बुधवार) दि. १२ रोजी तालुक्यातील आपसिंगा येथील चंद्रकांत महादेव तोडकरी, (वय ४६) रा.आपसिंगा यांना किडणीचा आजार असून, त्यांच्या छातीत खरखर व दम भरत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे घेऊन जात असतांना, माळुंब्रा येथे रक्ताची उलटी झाल्याने, त्यांना परत तुळजापूर येथील शासकिय दवाखान्यात पहाटे ४-२० वाजणेच्या सुमारास आणले असता, डॉ.रोचकरी यांनी चंद्रकांत तोडकरी यांना तपासुन मयत झाल्याचे सांगितले. याबाबत सुर्यकांत महादेव तोडकरी, रा.आपसिंगा, यांनी दिलेल्या जबाबवरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात आम्र नं. ६१/१८, कलम १७४ सी.आर.पी.सी. अन्वये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यांत आली.

 
Top