तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर येथील सुर्या धाब्याजवळ अज्ञात मोटार सायकलस्वारने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल हयगयीने व निष्काळजीपणाने चालवून एकास पाठीमागुन जोराची धडक देवून, गंभीर जखमी करुन अपघाताची खबर न देताच निघुन गेला. अज्ञान मोटार सायकलच्या धडकेत एक जण मरण पावल्याने तुळजापूर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजेंद्र राऊ राठोड, (वय ३२) रा. अंबेजवळगे (तांडा), ता.जि. उस्मानाबाद हे मंगळवार दि. ११ रोजी रात्री ८-३० वाजणेच्या सुमारास तुळजापूरकडे येत असतांना सुर्या धाब्याजवळ अज्ञात मोटार सायकलस्वारने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल हायगई व निष्काळजीपणे चालवून पाठीमागुन जोराची धडक देवून व अपघाताची खबर न देता निघून गेला. अज्ञान मोटार सायकलच्या धडकेत राजेंद्र राठोड हा मरण पावला. याबाबत मयताचा चुलत भाऊ उमेश सिद्राम राठोड, रा.अंबेजवळगे (तांडा), ता.जि.उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादवरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटार सायकल चालकाविरुध्द गु.र.नं. २८३/१८, कलम २७९, ३०४(अ) भा.दं. वि.सह १३४(अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोहेकॉ मनगिरे हे करीत आहेत.