काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील द्राक्ष बागायतदार महादेव विनायक वडणे यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सोलापूर विभागाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माळुंब्रा येथे बुधवार दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळी पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गायकवाड व माजी उपसरपंच विकास वडणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती शिवाजी गायकवाड, माजी उपसरपंच विकास वडणे, ग्रा.प.सदस्य अंगद वडणे, दिगंबर वडणे, अरूण मगर गुरूजी व प्रविण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीमुळे माळुंब्रासह परिसरातून कौतुक केले जात आहे.