तुळजापूर : कुमार नाईकवाडी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक महादेव गणपतराव देशमुख यांना टिळक महाराष्ट्र  विद्यापीठ पुणे यांच्याकडून पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे.  

"तुळजापूरचा सामाजिक राजकीय व सांस्कृतिक इतिहास : 1900 ते 2000" या विषयावरील शोधप्रबंध प्रा. महादेव देशमुख यांनी कर्मवीर भाउराव पाटील महाविद्यालय पंढरपूरचे प्रा. डॉ. विकास लक्ष्मण कदम यांच्या मार्गदर्षनाखाली टिळक महाराष्ट्र विद्यापीठ  पुणे यांच्याकडे सादर केला. 

त्यांच्या या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष आमदार मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, सचिव उल्हास बोरगांवकर, उपाध्यक्ष संभाजीराव पाटील बाभळगांवकर, संचालक बाबुराव चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, माजी प्राचार्य डॉ.जे.एस.मोहिते, अधीक्षक धनंजय पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top