तुळजापुर : कुमार नाईकवाडी
नक्षलवादी आणि देशद्रोही यांचे समर्थन करणारे तथाकथित बुद्धीजीवी विचारवंत, पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समिती तुळजापुर यांच्या वतीने येथील तहसीलसमोर आंदोलन करुन तुळजापुर येथील तहसीलदार यांच्या मार्फत केद्रींय गृहमंत्री यांच्याकडे बुधवार दि. १२ सप्टेंबर रोजी एक लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, व्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन नक्षलवाद्यांचे समर्थक,देशविरोधी भाषणे करणारे घोषणा देणारे त्यांचे समर्थन करणारे त्यांना आर्थिक आणि अन्य प्रकारे सहाय्य करणाऱ्या कडक कारवाई करणारा कायदा बनवावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, ज्या राजकीय नक्षल समर्थक नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला व त्यांना समर्थन दिले अशा नेत्यांना निवडणुक लढविण्यास बंदी घालावी त्याच बरोबर ज्या पक्षानी नक्षल समर्थकांसाठी उघड समर्थन दर्शवणारी भुमिका घेतली त्यांची ही नोंदणी रहित करावी.सीपीआय(माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे देशभरात सक्रीय सदस्य जंगलात लपुन बसलेले नक्षलवादी तसेच शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्या सर्वाची पाळे मुळे खणुन ती नष्ट करावी सैन्य आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करुन नवी व्यवस्था उभारणी साठी चा प्रयत्न हा देशद्रोह आहे अशा सर्वावंर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर विलास पुजारी, अविनाश देशमुख, अक्षय आडसकर, गिरीष लोहारीकर, सर्वोत्तम जेवळीकर, विनोद रसाळ, अमित कदम, समाधान भोसले, सुधीर कदम, विजय भोसले, अर्जुन सांळुके, अलोक शिंदे, सौ. अनिता बनगे, सौ. रोहिणी भोसले, कल्पना क्षिरसागर, हिरालाल तिवारी, युवा सेनेच्या माहिला आघाडी तालुका प्रमुख किरण चौधरी, छावा संघटनेचे कुमार टोले, दत्ता सोमाजी संदीप बगडी, विनायक माळी, उमेश कदम, उदय सांळुके, परिक्षित सांळुके आदीसह हिंदु जन जागृती समिती सदस्यांच्या स्वाक्ष-या आहेत.